नारायण हरी गोविंद मुरारी।
अनंता श्रीहरी पांडुरंगा॥धृ॥
पद्मनाभ हरी मुकुंद मुरारी।
केशवा गिरिधारी नारायणा॥
व्हावी तुझी कृपा दृष्टी जरी आम्हावरी।
घेउनिया भक्ती देशी आम्हा मुक्ती॥
कृपाळुवा अनंता धन्य तुझी माया।
सोडवावे आता पाशातून राया॥
म्हणे गंगाधरसुत जपता नाम मुखी।
आणिक पूजा न लगे भक्तासी॥
(वरील पद्य मिश्रपिलू रागात गायक श्री प्रशांत काळुंद्रेकर यांनी संगीतबद्ध करून दि.२/०९/२००९ रोजी नरवीर तानाजी मंडळ, पाचपाखाडी , ठाणे, आयोजीत गणेशोत्सवात , भक्तिरंग या कार्यक्रमात सादर केले. )