" माझी आजी"
माझी प्रेमळ आजी, सर्वाहून निराळी ।
रोज उठविते प्रेमाने, गात मला भूपाळी ॥
स्नान घालुनी छान, कपडे घाली मला ।
शाळेसाठी माझ्या देई, रोज खाऊ मला ॥
माझे मोठे दप्तर, घेऊन चाले माझ्या संगे ।
वाटेमध्ये शाळेच्या, छान गोष्टी मला सांगे ॥
काही खान्या केले जरी, मला ती थोडे देई ।
रात्री कुशीत घेऊन मला, "पऱ्यांच्या राज्यात नेई" ॥
अनंत खोंडे.
३ सप्टेंबर २००९