गणेशोत्सव

एक, दोन, तीन, चार
गणपतीचा जयजयकार
गणेश आले हो पथावर
घरी आणू  या, मोरेश्वर

सुशोभित केले सिंहासन
सुस्थापित केले गजानन
पत्रीफुले, केवडा वाहून
मनोभावे केले हो पूजन

गाऊनी हो, सुंदर भजन
केले तयांचे, थोडे रंजन
आरती गात, केले वंदन
चित्त झाले, किती प्रसन्न

आरत्या  होती  उत्साहाने
अनेक देवांच्या आवाहनाने
नैवेद्य दाखवीला मोदकाने
गणेशासाठी केला आवडीने

घेती आनंद  महा आरतीचा
उत्सव असे दहा दिवसाचा
मुक्काम संपे हो गजाननाचा
निरोप घेती, मग ते सर्वांचा

जाताना सांगती हो सर्वास
प्रेमाने जागा बरे बंधुभावास
करू नका कुणाचा दुस्वास
सोडता येईल मला निश्वास

वचन देती जन गजाननाला
जागू आमुच्या ह्या वचनाला
गणपती जातात हो गावाला
चैन पडत नाही हो आम्हांला