" नातू "
नातू म्हणजे काय। दुधावरची साय ।
त्याच्याशी मी गप्पा मारतो ।
प्रश्न त्याला विचारीत असतो ।
उत्तरे ही मग मीच देतो ।
दोन्ही ही वेळी तो, मात्र हसत असतो ।
त्याचे ते निरागस हास्य पाहून ।
मी मात्र मोहून जातो। मी मात्र मोहून जातो ॥
अनंत खोंडे.
४ सप्टेंबर २००९