लोक नेहमी मला माझे बनून फसवायचे;
जगणे शिकवतो म्हणून मला ढकलूनच की हो द्यायचे.
जगण्याची हि रीत कसली हा तर वायद्यांचा बाजार;
घाबरलेल्या माझ्या मनाला या कुबड्यांचाच आधार,
मरतानाही जगण्याचा आक्रोश पाहिला मी;
हरवत जाणाऱ्या स्वप्नांचा अंधार पहिला मी.
जगायचं कस हे कधी माझं मला कळत नव्हत;
काहीच नव्हत माझं पण वेड मन मानत नव्हत.
हरवलेल्या वाटा माझ्या मी पुन्हा पुन्हा धुंडाळल्या;
पण वाटेवरच्या राखेच्या खुणाच फक्त गवसल्या.
मी कसा होतो असे प्रश्न नेहमीचं मला पडायचे;
शोधून झाले अर्थ सारे पण उत्तर कधी न मिळायचे.