व्यंग

कोणी असतो अंध, कोणी बहिरा ठार
कोणी मुका, कोणी अवयवाने लाचार
कोणी श्वेतकुष्टी, समाजाने असे बेजार
व्यंग व्यक्तीवर, टाके समाज बहिष्कार

देवाने दिले असते असे हे सुंदर जीवन
ठेवले त्यानी मनुजात, कसे असे न्यून
कारे निर्मिले त्यानी, सज्जन वा दुर्जन
पांगळे केले मनुजास, असे व्यंग देऊन

व्यंग करते मनुष्यास, मानसिक दुबळे
हैराण हताश होती,त्यामुळे हो सगळे
लढती मात्र त्यातही, कांही हे मावळे
विजय मिळवती संकटी, बरका खुळे

सहन करती व्यंगी,कुत्सित ह्या नजरा
व्यथित करे त्याना, हीन वृत्तीचा तोरा
मानखंडना करणे,हाच सबळांचा नारा
नसे दुर्बलांना मग, समाजात तो थारा

करूनी मात ही, आपुल्या त्या व्यंगावर
दाखवील जिद्द जो,आपुल्या रे कामावर
विजय मिळवील जो, अशाच संकटावर
तोच आनंद घेईल, पहा संपूर्ण जीवनभर