एक कळी हास्याची

एक कळी हास्याची
ओठांवरी असावी
विनवेल जग हे सारे
परी माझ्यास्तव उमलावी

नजरेला नजर भिडावी
हृदयाचे बंध तुटावे
शब्दांना कळले नाही
ते डोळ्यांनी बोलावे