मी मुळातच जन्माला का आलो
असा त्या घटकेला झाला होता - समज
शाळेत कदाचित देतील मला - समज
असाच होता सगळ्यांचा - समज
मी असमंजसच राहणार
हा झाला मास्तरांचा - समज
अहो, मी माणूस नाहीच
असाच झाला सख्ख्या आईचा - समज
पण ह्याला जबाबदार ही आईच
असाच झाला माझा - समज
आजूबाजूच्या रवंथांनी ( विचारवंत? )
मला दिला भरपूर - समज
शेवटी मीच शोध घेतला
प्रकार काय हा - समज
गाढव आणि त्याचा मालक
ह्या गोष्टीतून शोधला मी - समज
मला समजण्याचे ह्या समंजसांना
कधी येणार का हो - समज
खरंच सांगा, तुमचा काय आहे - समज?
थोडे फार असेच शब्द वापरून मी ही कविता - मस्कतरंग - १९८४ - ८५ च्या हस्तलिखितातून प्रसिद्ध केली होती.