पूर्णविराम

आयुष्याच्या वाटेवर चालताना

भेटतील चौक

जुळतील वाटा

वळणं वळणावर.

असेल एखादी काटेरी पांदण

एकटीच जाणारी.

उमटतील खुणा

पाऊल वाटांच्या

नागमोडी धावत जाणाऱ्या

उगवेल केव्हातरी

एखाद्याच ठिकाणी हिरवळ.

पण

असेन एक ठिकाण

याच वाटेवर

जिथं असेल

आयुष्याचा पूर्ण विराम.

..... साहेबराव खानसोळे.