रात्र होती ती सुंदर पुनवेची
शीतल, पिठुरशा चांदण्याची
चांदणे पडे सर्व बागेवरती
बागेतील सर्वच झाडावरती
सावल्या त्यांच्या धरतीवरती
चित्रविचित्र हो आकार घेती
रात्रीच्या अशा त्या नीरवतेत
सावल्यात गंभीर गूढता येत
झाडावरील पर्णांना अलगत
स्पर्शुनी जातसे हवेचा झोत
हलचाल ती निर्माण करीत
जमिनीवरील त्या सावल्यात
मानवी मन असे खूप विचित्र
हलताना पाही सावली चित्र
भीती निर्माण होत असे मनांत
निसर्ग खेळतो खेळ तो मजेत