ऊन

आज कितीतरी दिवसांनी इथे मुंबईत ऊन पडलंय. इतके दिवस पावसाने झोडपलेली, मंदावलेली मुंबई आता परत नेहमीच्याच वेगाने कामाला लागलीये. तर या अशा ऊन्हाचीच ही कविता...

ऊन पडलंय आज, चमकदार ऊन.
काळ्या ढगांखालचं धुरकट जग नाहीसं करून,
ऊन पडलंय आज, चमकदार ऊन.

ऊन पडलंय आज, चमकदार ऊन
कडाडणार्‍या मग्रूर विजांना उत्तर म्हणून,
ऊन पडलंय आज, चमकदार ऊन.

सगळंच कसं दिसतंय आता
स्वच्छ, सुंदर आणि गरम
चमकतायत आता प्रत्येकाचे डोळे
आणि त्यातले खरेखुरे भाव
माणसा माणसांतल्या कटू सत्याची ओळख देऊन
ऊन पडलंय आज, चमकदार ऊन.

अगदी काल रात्रीपर्यंत भिजून कुडकुडणारा तो
मनातून मात्र आनंदीच असायचा
आता परत त्याच्या कपाळावर आठी
आणि एकट्यानेच चालण्यात पूर्वीचा वेग
भुवईत जमणार्‍या घामाबरोबरच माणसांना दूर करून
ऊन पडलंय आज, चमकदार ऊन.

हीच कविता आपण http://alhadmahabal.wordpress.com/2009/09/08/%E0%A4%8A%E0%A4%A8/ इथेही वाचू शकता.

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.