नऊ तारखेचा घोळ

नशीब माझे भाग २ लिहीत बसलो होतो तेवढ्यात टीव्हीचा मोठा आवाज ऐकल्याने
मी भविष्यवाणी चा कार्यक्रम लक्ष देऊन ऐकलं. ९.९.२००९ आणि  घडाळ्यात ९
वाजून ९ मिनिटे झाली होती. तो महाराज बाबा आणि कार्यक्रमाची सूत्र
संचालिका टाहो फोडून त्या घटकेचे महत्त्व पटवून देण्याचा भरपूर प्रयत्न करत
होते.

चौफेर विचार करण्याची माझी वाईट (?) सवय, डोक्यातला किडा शांत बसू देईना. 

  • ह्या
    बाबाचे बघा ना, त्याचे ग्रह त्याला व चॅनलवाल्यांना भरपूर मदत करण्यात
    मग्न आहेत
  • एस एम एस आणि दूरध्वनी सेवा देणार्‍या कंपन्या लाखो रुपयांचा
    फायदा हडप करण्यात यशस्वी होत आहेत.
  • ह्या कार्यक्रमाचे टीआरपी चांगले आहे असे दाखवून चॅनलवाले जाहिरातदारांकडून जास्त पैसा उकळण्यात यशस्वी होत आहेत.
  • जाहिरातदार जाहिरातीचा खर्च आम्हा ग्राहकाकडून वसूल करण्यात यशस्वी होत आहे. 
  • खोटे बोलूनये, कोणाला फसवूनये, कोणाला फसवण्यात मदत करू नये असे शिकवलेला युवक अथवा युवती आपल्या सुंदरतेचा उपयोग करीत, मास कम्युनिकेशन्सची
    पदवी मिरवीत जनतेला मोठ्या दिमाखात घोळात घालण्यात, चॅनलवाल्यांना मदत
    करण्यात यशस्वी होत आहे.  
  • आज हिजरि अथवा हिंदू तारीख मोजणीत  ९. ९. ०९ अशी तारीख नाही, मग ह्या अद्भुतं तारखेचे महत्त्व कोणाला आहे.

सगळाच  घोळ. ही सगळी "घोळकर" मंडळी घोळ घालण्यात यशस्वी होत आहेत हेच आजचे महत्त्व.