सुख आणि दुःख

सुख
आणि दुःख ह्या दोनच गोष्टींनी मानवी आयुष्य ओतप्रोत भरलेल आहे. क्षणभर
सुखासाठी धावणारा जीव किती अतोनात दुःख, क्लेश, ताण, तणाव स्वतःहून ओढून
घेत असतो. काय तर दोन क्षण सुखाचे घालवता यावे म्हणून.

                     
वर वर पाहता ह्याच काही वाटत नसल तरी मृत्यू जसे जगातले शाश्वत सत्य आहे
तसेच सुख आणि दुःख हे प्रत्येक प्राणिमात्राच्या आयुष्यातील शाश्वत सत्यच
आहे आणि ते आपण नाकारू शकतच नाही. भुकेसाठी, मायेसाठी, मानासाठी, प्रत्येक
प्राणिमात्र

ह्या जगात वण वण हिंडत असतो, पण तृप्ती होईपर्यंतच एकदा का तृप्तीचे जे काय आहे ते क्षण संपले की पुन्हा त्याच्यासाठी वण वण ही आहेच.
दोन
वेळेच जेवायला मिळावं , डोक्यावर स्वतःच छप्पर असाव, अंगावर
लज्जानिवारणार्थ वस्ञ असावे ह्या साठी माणूस किती कष्ट करतो पण ह्या पैकी
किती गोष्टी आपण एक वस्ञ सोडले तर बाकीच्या वस्तुंचा उपभोग कितीसा घेतो? .
आणि त्यातल्या त्यात आजकाल वस्ञांचा वापर तसा

निवारणार्थ ऐवजी प्रदर्शनार्थच अधिक होत असल्यामुळे हळू हळू आपला संबध कमीच होतोय. असो....
                      
विनोदाचा भाग सोडला तर मानवाला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान असुनही माणुस हे
सत्य स्वीकारायला का तयार होत नाही? हेच

कळत
नाही. बरं दुःखाचे म्हणावे तर दुःखांत तो जग रहाटी सोडताना तो कधी दिसत
नाही. कोणाचे कोणी वारले तर त्याबरोबर लगेच कोणी वारल्याचे ऐकीवात नाही
अपवाद फक्त शिवाजीच इमानी कुत्रा तो काय?

                      
सुख असो की दुःख ते निसर्गनियमाप्रमाणे स्वीकारावे म्हणजे शल्य कमी होते.
कोणतीही गोष्ट स्वीकारताना ती कितीही आनंददायी असो वा दुःखदायी तो
जीवानाचा एक भाग आहे म्हणून स्वीकारावा , त्यास विशेष महत्त्व नसावे असे
मला वाटते. सुटलेली लोकल

हळ
हळ करून पुन्हा फलाटावर येणार का?, एकदा खाल्लेल अन्न आयुष्यभर पुरणार का
? उत्तर नाहीच येणार मग ह्या गोष्टींची विशेष दखल घेण्यात काय अर्थ. ह्या
वर कोणी मी निष्क्रीयवादाचा भोक्ता आहे पण तसे नाही क्रिया तर केली पाहिजे
पण प्रत्येक क्रियेला इच्छित परिणाम

प्राप्तच होतील असे नाही आहे ते आहे त्या पद्धतींत जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय आहे का कोणाच्या हाती?
आहे ते आंदाने स्वीकारा नि आनंदी राहणे एवढेच काय ते आपल्या हाती आहे.