"प्रीतिची पहाट"

" प्रीतीची पहाट"

बायको माझी स्वयंपाक करते ।

त्रासून नयनात अश्रू आणते ॥ध्रु॥ बायको...

वरण करता डाळ कच्ची ।

करते वरून ती बाचाबाची ॥

तिखट कमी मीठ जादा टाकते॥ध्रु॥बायको...

पोळ्या सर्व जगाचा नकाशा ।

भाजून करी समान कोळश्या ॥

मऊ करण्या त्या तूप फासते ॥ध्रु॥बायको...

भाजी नसे ती भासे पाला ।

त्रास नको म्ह्नणे जीवाला ॥

ताट वाढूनी पुढे ठेविते ॥ध्रु॥बायको...

वेडावून मी तोंड करता ।

उपहासाने उगी हासता ॥

ती क्षणी बावरी होते ॥ध्रु॥बायको...

मी खाता ते उत्साहाने ।

ती वाढते आग्रहाने ॥

प्रीतीची मग प्रभा उगवते॥ध्रु॥बायको...

अनंत खोंडे.

१०सप्टेंबर २००९.