चिंटू म्हणाला आईला
मजा येते ग खेळायला
खेळल्यानंतर खायला
मग जायचे ते कशाला
रोजरोज त्या शाळेला?
आई म्हणाली चिंटूला
शहाणे व्हायचय तुला
व्यवहार ते कळायला
शिकावे लागे शाळेला
दिली हातात नोट तुला
कळे कसे कितीची मुला
अडाणी असेल रे त्याला
फसवेल जग,बघ मुला
वाचता येत नसेल तुला
कळे कसे तू कुठे मुला?
रस्त्याने चुकलास मुला
सांगे पत्ता कसा कुणाला?
पदोपदी तू अडशिल मुला
म्हणून शिक्षण जरुरी तुला
चिंटूने त्यावर विचार केला
आईचे म्हणणे पटले त्याला
जाईन मी रोजच शाळेला
शिकुनी दाखवीन आईला