...खेड्यामधली कुणी पोरगी !

........................................
...खेड्यामधली कुणी पोरगी !
........................................

किती दिसांनी
आलेली ही तुझी आठवण
मेंदूच्या शहरात हिंडते
बापुडवाणी...

बावरल्यागत !

चुकलेली ही
खेड्यामधली कुणी पोरगी
याला-त्याला वाट विचारी
नव्या ठिकाणी...

घाबरल्यागत !

- प्रदीप कुलकर्णी

........................................
रचनाकाल ः ६ जानेवारी २००९

........................................