आई जगदंबा

हिरव्या साडीवरती, लेऊनी रत्नालंकार
माते अससी तू सगुणाकार
दुःखित पिडित भक्तजनांचे
दुःख निवारण करुनी त्यांचे
आनंदी मग पाहुनी चेहरे
होसी माते खूपच हर्षित, बनुनी त्यांचा आधार...
दुष्ट पापी नराधमांना
देसी शिक्षा,खूप यातना
यमराज तो बनुनी,त्यांचा
सर्व जगाला खरा दाविसी, तुझाच चमत्कार....
ठेऊनी श्रद्धा, हृ्दयी माते
करती सेवा, आपुल्या हाते
कृपावंत तू, होऊनी माते
देसी कुणाला नुसता कौल, करसी कुणाचा उद्धार...