स्वप्नांचा महापुर
आणि वास्तवाची भिषणता
याच्या कसोटीत
नियतीला मीच कसा सापडलो
फुलांचा सुगंध
आणि हृदयाचे खेळ
याच्या कसोटीत
प्रेमाला मीच कसा सापडलो
आयुष्यभराचे निष्पाप जगणे
आणि क्षणात होरपळविनारे दुःख
याच्या कसोटीत
अर्धसत्याला मीच कसा सापडलो
( मनोगता वरील ही माझी(स्वत: ची) पहिलीच कविता, आवडल्यास जरूर कळवा. -- अरविंद जाधव)