"माझी अमेरिका"

               "माझी अमेरिका"

  प्रत्येक येणाऱ्याला वाटते, माझी ही अमेरिका ।ध्रु।

  विसरे मातृभूमिला, पाहून सुखसोयी येथील बर का!

 कोणत्याही देशाचा असो नागरिक ।

  व्हावे वाटे त्याला येथे स्थायिक ॥

  सुख कोणाला नको असते का? ।ध्रु।१।

  जो येतो तो येथे रमतो ।

  पाहूनी सुविधा हरकून जातो ॥

  सहज सर्व गोष्टी येथे उपलब्ध होतात बर का! ।ध्रु।२।

  तुम्हा येथे पूर्ण स्वातंत्र्य आहे ।

  सण साजरे करता पाहे ॥

  कुणाचाही येथे हस्तक्षेप नाही बर का! ।ध्रु।३।

  कामाचा दर्जा येथे कोणताच नाही ।

  सर्वजण कोणतेही काम करत राही ॥

  सर्वांनाच येथे मान मिळतो बर का! ।ध्रु।४।

  प्रदुषणाला नाही थारा ।

  थंडी, पाऊस वा असो वारा ॥

  काळजी सर्वच घेतात बर का! ।ध्रु।५।

  येथे नवे शोध नि अभ्यास सतत चालू असतो।

  सर्व खेळांमध्ये यांचा ठसा उमटून दिसतो ॥

  त्यामुळेच जगात नांव लौकीक आहे बर का! ।ध्रु।६।

  नियमांचे पालन सर्वच करतात ।

  शिस्तित सर्व वागत असतात ॥

  शासनाचा धाक सर्वांनाच आहे बर का! ।ध्रु।७।

   अनंत खोंडे

  १६ सप्टेंबर २००९.