प्रीत

चांदणे प्रीतीचे आज, पसरे हो मम मनी
लाज वाटे सांगण्या,गुपित मजला जनी

प्रवेश करे प्रीतमत्स्य, तो मन सरोवरी
उठती विविध तरंग, आज माझ्या उरी
काय म्हणती भावनास,सांगाल का कुणी?
लाज वाटे सांगण्या, गुपित मजला जनी

स्पंदने उडवुनी देई, प्रीतमत्स्य मम हृदयी
व्यापून टाके तनमनास, होई कसा विजयी
सुचत नसे कामधाम,ध्यास सजणाचा मनी
लाज वाटे सांगण्या, गुपित मजला जनी

ओढ लागे सजणाचीच, मजला ती कशी
हुरहुर लागली असेल का,सजणासही अशी
प्रीत म्हणती यासच का,सांगा तुम्ही गुणी
लाज वाटे सांगण्या,  गुपित मजला जनी