स्फूर्ती

का मलूल झाला, माझा गुलाब आजला
खूप विचार करता, प्रश्न  पडला  मजला

होता किती हसरा, ताजा टवटवीतपणा
गेल्या मिटून त्या, अवखळ  खाणाखुणा

होता किती सुंदर, खळखळता हा झरा
आटून गेला कसा, अभावी नयन नीरा

का उदास होऊन, तू बनलीस ग मीरा
उभारी धरून मना,मात कर ग आजारा

पडलिस निष्क्रिय, निष्तेज होऊन गादीला
स्फूर्ती मम काव्याची, गेली कशी लयाला