माहुरगड शक्तिपीठ

असते माहुरगडी रेणुकामातेचे वसतिस्थान
दर्शन घेण्यास मातेचे, हरपून जाते देहभान
वाजे मंदिरी मातेच्या,  मंगल सनई  वादन
दर्शन घेऊनी भक्त,  करती पीडेचे  क्षालन

अर्पुनी महानैवेद्य व  सहस्त्र पानाचा वीडा
रेणुका मातेस वंदती,  टेकुनी माथा गडा
असे परिसर सुंदर, दोन शिखरे माहुरगडा
मंदिर रेणुकामातेचे असते,एक शिखरकडा

जन्मस्थान  गुरुदत्ताचे, दुसऱ्या शिखरावर
वास्तव्य सती अनुसुयेचे, तेथे सुंदर मंदिर
दर्शन घेती भक्त, मातेसह श्रीदत्ताचे सुंदर
जाती भक्त, ध्यान मातेचे ठेऊनी मनमंदिर