देवा तुझिया सुंदर,किती या जगतात
बदलला माणूस,पहा किती भारतात
चंगळवाद किती बरे, शिरला जनात
विसरे कशी नितीमत्ता, आहे धर्मात
चंगळवाद आहे, का रे आजचा धर्म
करण्यास पाडते कसे, भाग कुकर्म
जाणिले जयांनी, मनी याचे हे मर्म
सुरक्षित राहून कसा, वाचवे अधर्म
वाढला भारतात,पहा अति भ्रष्टाचार
करती नराधम,पाशवी ते बलात्कार
गुंड करती ,जातीय दंगे अत्याचार
गर्द, एडचा युवापिढी,करे अविचार
नितीमत्तेची चाड, कशी नसे नारीत
धन्यताच मानती त्या,देह प्रदर्शनात
कपड्याविना नारी दिसे दूरदर्शनात
पाहुनी मुले ते बोट घालती तोंडात
पाहुनी अनाचार हा, देव कोपतात
धडा मानवास, शिकवावा ठरवतात
मग येते सुनामी, आपुल्याच तोऱ्यात
लाखो होती बेघर,अनेक ते मरतात
मग होतो उद्रेक,पहा कसा भूकंपात
घरेदारे मानव, गडप होती भूगर्भात
विवंचना मानवास,अन्न मिळवण्यात
विचलित होई लक्ष,हो चंगळवादात
होई कशी अतिवृष्टी, दक्षिण भारतात
अनेक गावे जाती,बुडून ती पाण्यात
होई संहार जनतेचा,मोठ्या अरिष्टात
दूरस्थ होई मानव, तो चंगळवादात
कधी पडे आकाल, भीषण पाहा देशात
मिळे ना पाणी लोका, पिण्यास, शेतात
मरती मानव,असंख्य, या उपासमारीत
चंगळवाद विसरून, पडतात काळजीत
देवा, तुझा किती, होता सुंदर भारत
कधी होईल आता, तो असा पूर्ववत
जीवन लोकांचे नाही, पहा ते शाश्वत
आशा करतोय मी,शक्ती तुझ्या कृपेत