आई
पाहूनच मन थंड करणारा
खळखळणारा झरा आई
सगळं पोटात घेऊन शांतपणे
वाहणारी नदी आई.
बाबा रागावले की हळूवार
प्रेमाने जवळ घेणारी आई
कधी चुकू लागले पाऊल
भल्यासाठी कठोरता दाखवणारी आई.
प्रेम, माया, ममतेने बनलेली
भव्यदिव्य मुर्ती आई
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
लागणारी स्फुर्ती आई.
काय लिहिणार कोण आईवर
शब्दांनाही कोडं पाडणारी व्यक्ती आई
कशाचीच तुलना होऊ शकत नाही
अशी अनाकलनीय शक्ती आई.
... आरती