आरती देवीची

जयजय जय जगदंबे माता
तूच भवानी अससी त्राता

नमन तुज, मनोभावे माता
गोंधळ घालित रात जागता
उदो कारे तव, नाव गर्जता
विसर पडे,  दुःखाचा माता
जयजय जय जगदंबे माता

संसारी आपत्ती, मज येता
नामस्मरण, तुझे मा करता
लढण्या संकटी,शक्ती देता
कृपा करसी,भक्तावर माता
जयजय जय, जगदंबे माता

बाला घाटी, निवास माता
पावन करसी, परिसर आता
ओढ लागते, तुझीच माता
कृपा कर गे, तुझिया भक्ता
जयजय जय, जगदंबे माता