तो झुला

तो झुला होताच माझा टांगलेला।
जीव त्याने रोज माझा टांगलेला।।१।।
हा नभीचा चंद्र जेव्हा झुरत जातो
तारकांचा जीव आता टांगलेला।।२।।
हे गुलाबच आता कसे बोचताती ।
हृदयी कंटकच का त्याचा टांगलेला।। ३।।
मीच केला भावनांचा कोंडमारा।
मग कशाला दुःखा ठेवू टांगलेला।। ४।।
वाट माझी मीच अडवी परत कशी?
प्रश्न माझा रोजचाही टांगलेला ।।५।।
सागर असा झुरतो का लहर येता ।
हा किनारा रोज राही टांगलेला।।६।।

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, गोवा