रात्र होताच अंधाराची तुझ्या आठवणी;
माझ्या डोळ्यांवर अलगद उतरतात;
मी त्या आठवणींवर जगताना;
कितीदातरी कण्हलो होतो.
तू नेलेल्या त्या धुंद दिवसात;
कितीदा मी फिरलो होतो;
पण तुझ्या आठवणी वागतात;
निःशब्द असल्यासारख्या.
अन् मला वाटतात त्या;
तुझ्या गूढं सावल्यांसारख्या;
रात्रभर झोपेत तळमळताना;
मला त्यांना हाकलताही येत नाही.
कारण माझे हेच हात;
मी कधीकाळी तुझ्या हातात दिले होते;
सकाळी सकाळी;
रात्रभर उघड्या असलेल्या माझ्या डोळ्यांपुढे;
त्या आठवणी भुरकन उडून जातात;
कारण त्यांना मला उभं करायचंच नसतं;
त्या फक्त मला मोडण्यासाठीच आलेल्या असतात.