फक्त मलाच अन् माझ्यासाठीच

आयुष्याच्या एका वळणावर कुठेतरी;

तुझे माझे रस्ते एकमेकांना मिळाले;

तेव्हा पाऊस कोसळत होता अन्;

त्या रेशमी सरितं गुरफटत गेलो आपण दोघे.

तुझ्यावरून घरंगळणारे पाण्याचे थेंब;

मोती बनून माझ्या तळहातावर आले;

अन् त्या एका गडद, मोहक क्षणी;

मला तुझीच व्हावेसे वाटले.

तुझ्या मनात,ध्यासात,स्वप्नात;

फक्त मलाच बागडायचं होतं;

असा काय बघतोयस माझ्याकडे;

तुला बघूनच तर माझं मन वेडावलं होत.

हे सगळं घडणार नसेल ना;

तर तुझ्या डोळ्यातला एक कप्पा;

राखून ठेव फक्त माझ्या स्वप्नांसाठी;

कधी आलीच दाटून माझी आठवणं;

         

       तर निदान अश्रू तरी गाळ फक्त माझ्याचसाठी.