पाहुनी शिखरे, सातपुड्याची
भासे बोटे, नाजुक अवनीची
अरुणोदय, शिखरात होताची
भासे मज मुद्रिका, माणकाची
तेज असे हो, लाल माणकात
प्रभा पडे ती, निळ्या गगनात
लाल छटा ह्या,नभी पसरतात
मनमोहक दृष्य, साठे नयनात
पाहुनी असा, निसर्ग अविष्कार
मनांत विचार, होती हे साकार
सांगती महत्त्व, रत्नाचे आजवर
आहे सामर्थ्य,हो रत्नात खरोखर