आपल्या घरातील आपली प्रिय व्यक्ती ध्यानीमनी नसताना एकदम कोसळली तर आपल्याला किती धक्का बसेल व त्या परिस्थितीतून सावरून पुढील उपाय योजना करणे हे तर तारेवरील कसरतीचेच पण अत्यंत कठीण काम आहे. अशावेळी आलेल्या परिस्थितीला न डगमगता सामोरे जाऊन धैर्याने तोंड देणे व वैद्यकीय मदत वेळेवर मिळवणे हे अत्यंत गरजेचे असते. असाच एक प्रसंग माझे मेव्हणे श्री. रमेश जानोरकर यांच्या आयुष्यात घडला.
रमेश जानोरकर आपल्या परिवारासोबत इंदूर येथे राहत होते. त्यांचे वय साधारण सत्तरीच्या जवळ असेल. त्यांचा एक पाय ऑपरेशनमुळे थोडा अखुड झाला असल्याने त्याना हातात काठी घेतल्याशिवाय चालता येत नाही. तसे ते अपंगच आहेत. त्यांची पत्नी सौ. किशोरी वय ६५ वर्षे यांचे बरोबर आपल्या मुलाबरोबर राहतात. मुलगा व सून कामावर गेल्यावर ही दोघे घर सांभाळीत असत. त्यांची नात अपूर्वा वय १२ वर्षे शाळेतून घरी आल्यावर तिच्याशी गप्पा मारत त्यांचा वेळ कसा जात असे ते त्याना कळत नसे. त्यांचा स्वभाव मनमोकळा असल्याने शेजार पाजार सर्व ओळखीचा व प्रेमळ होता.
ऑगस्ट महिन्यात त्यांच्याकडे त्यांची बहिण शैला वय ६८ वर्षे ही नाशिकहून चार दिवस राहण्यासाठी आली होती. श्रावणाचा महिना असल्याने दर सोमवारी सर्वजण उपवास करून संध्याकाळी उपवास सोडत असत. दिनांक १८ ऑगस्टला, नात शाळेला गेल्यावर हे तीघेजण इंदूरमधील महादेवाच्या देवालयात दर्शनास गेले. तेथे जवळ पास अशी बरीच मंदिरे असल्याने दोन तीन मंदिरे बघून ते परत घरी येण्यास निघाले. मात्र दुपारची वेळ, दोन तीन मंदिराचा फेरफटका यामुळे सौ. किशोरीवहिनींना दमल्यामुळे अजिबात चालवत नव्हते. त्यामुळे सर्वांनी रिक्षा केली व ते घरी आले. सौ. किशोरीवहिनी अतिशय दमल्याने, " मी थोडा वेळ झोपते" असे सांगून झोपावयास गेल्या. त्या दमल्या असल्याने त्याना लगेच गाढ झोप लागली. साधारण संध्याकाळी ६ च्या सुमारास त्या उठल्या. घरात रमेश व शैला गप्पा मारत बसले होते. तेथे येऊन, " मी सर्वासाठी चहा करते " असे म्हणून स्वयंपाकघराकडे निघाल्या. व लगेच " आई ग " असे म्हणून तेथेच कोसळल्या. त्या कोसळताना पाहून रमेश व शैलाच्या तोंडचे पाणीच पळाले. बरे रमेश पायाने अधू असल्याने पटकन उठू शकत नव्हता. तरीसुद्धा त्याने लगेच काठी घेऊन सौ. किशोरीकडे धाव घेतली. त्याने व शैलाने सौ. किशोरीवहिनींना सावरले. त्यावेळेस त्यांची जीभ तोंडात अर्धवट बाहेर अडकलेली असून त्या निपचित पडल्या होत्या. दोघांच्याही काळजाचा ठोका उकला. घरात मदतीला कोणी नाही. अशा अवस्थेत रमेशने प्रसंगावधान राखून शेजारी असलेल्या अलोक काटिया याना बोलावून परिस्थिती सांगितली. शेजार चांगला असल्याने व त्यांच्याकडे गाडी असल्याने त्यानी लगेच गाडी काढली. तीघांनी मिळून सौ. किशोरी वहिनींना कसेबसे गाडीत घातले व जवळच असलेल्या डॉ. भंडारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पेशंटची आवस्था पाहून हॉस्पिटलच्या स्टाफने कोणतीही फॉरमालिटी न विचारता त्याना आय. सी. यू. म दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्याना व्हेंटिलेटरवर ठेवले. थोडा वेळाने डॉक्टरने बाहेर येऊन सांगितले, पेशंटची आवस्था अत्यंत क्रिटिकल आहे. म्हणून त्याचेबद्दल अत्ताच कांही सांगणे अवघड आहे. " त्यामुळे बाहेर सर्वांच्याच हातापायातील बळ गळाले. फोनवरून रमेशने मुलगा सतीश व सून पूजा हिला कळवल्याने ते दोघे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आले होते. पण डॉक्टरने असे सांगितल्यावर अत्यंत दुःखित अंतःकरणाने सौ. पूजाने पुण्याला तिच्या आईला ही बातमी दिली. तिने आईला येण्याविषयी गळच घातली होती. तिची आई मिळेल त्या गाडीने इंदूरला येण्यासाठी निघाली. सर्वजण दवाखान्यात गुंतल्यावर घरात त्यांच्या जेवणाचे कोण बघणार? हा प्रश्न होताच. शिवाय आधार देण्यासाठीही माणसाची गरज लागतेच. ती रात्र सर्वांनी रात्री न झोपताच हॉस्पिटलमध्ये काढली. हॉस्पिटल मधील डॉ. महेश थोरात यानी खूप मेहनत घेऊन त्यांच्या सर्व रुटीन टेस्ट घेतल्या. सौ. किशोरीवहिनींचे ब्लडप्रेशर खूप वाढले होते. त्याना डायबेटिस असल्याने साखरेच्या प्रमाणातही वाढ झालेली होती. व्हेंटिलेटर लावल्याने त्या कमीत कमी श्वास घेऊ शकत होत्या.
सकाळच्या वेळी त्या शुद्धीवर आल्या. त्यावेळेस त्यानी सांगितले, " मला श्वासच घेता येत नव्हता म्हणून मी पडले. " मग डॉक्टरने सर्व योग्य तो औषधोपचार करून त्यांची प्रकृती नॉर्मल कंडिशनला आणली. साधारण सकाळी दहा वाजता त्यांचा व्हेंटिलेटर काढला व त्या नॉर्मल श्वास घेऊ लागल्या. त्यांच्या घेतलेल्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्याने डॉक्टरलाही आश्चर्य वाटले. तरीसुद्धा त्यानी सौ. वहिनींना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेऊन निरीक्षण केले. नंतर दिनांक २१ ला त्यानी रु. ३०, ०००/- बिलाचे पैसे घेऊन डिसचार्ज दिला. हे सर्व हायब्लड प्रेशरने झाल्याचे निदान त्यानी केले. काळजी घेण्यास सांगून त्यानी कांही औषधे लिहून दिली. मग सौ. किशोरीवहिनींना घरी आणल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र हे ब्लडप्रेशर कशाने वाढले याचे कारण हे कळलेच नाही. पण अतिश्रम, काळजी, मधुमेह वगैरे कारणे असतील अशी समजूत करून सर्वजण शक्यतो सौ. किशोरीवहिनींना त्रास होणार नाही असे वागायचे ठरवून कामाला लागली.
आता सौ. वहिनींना बरे वाटत असल्याने त्या नेहमीचे काम करू लागल्या. यंदाचे दिवाळीस सर्व नातेवाईकांनी दिल्ली येथील भाचा अरूण एकबोटे कडे जमावयाचे असे ठरवले होते. माझे व माझ्या पत्नीचे दिल्लीचे तिकीट तीन महिने अगोदर पुण्याहून मी बुक केले होते. अरूणचे आईवडील व फॅमिली तयारीसाठी दहा दिवस अगोदरच पुण्याहून दिल्लीला जाणार होती. जानोरकर फॅमिलीनेही इंदूरहून दिल्लीची तिकीटे बुक केली होती.
अरूण एकबोटेचे घर गुरगाव येथील एस्सेल टॉवर या काँप्लेक्स मध्ये होते. सर्वजण दिवाळीच्या आधी एक दिवस एकत्र जमले. सर्वांनी आठ दिवस एकत्र घालवावयाचे असे ठरवल्याने खूप मजा आली. रमेश व सौ. वहिनींना दिल्ली पाहवयाची असल्याने त्यानी एक गाडी ठरवून दिवाळीनंतर दिल्ली शहरातील मुख्य ठिकाणे पाहून घेतलीऔ. वहिनींना अक्षरधाम मंदिरात थोडे जास्त चालावयास लागले पण त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला ताजमहाल पाहवयास जायचे असल्याने त्यानी घरापासून एक गाडीच ठरवली होती. त्याना सकाळी ५ वाजता निघावयाचे होते. पण पहाटे तीन वाजताच सौ. वहिनींना त्रास होऊ लागला. त्याना श्वास घेता येईना. मागचा अनुभव असल्याने अरूणने लगेच गाडी काढली व त्याना जवळच असलेल्या "मॅक्स" हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याना आय. सी. यु. मध्ये दाखल करून लगेच ऑक्सिजन दिला गेला. तसेच व्हेंटिलेटर लावले गेले. मग बाकीच्या तपासण्या सुरू झाल्या. पुन्हा सर्व रक्ताच्या तपासण्या, रक्तदाब, ई. सी. जी. वगैरे तपासण्या चारपाच दिवसात केल्या गेल्या. सर्व टेस्ट नॉर्मल आल्या. त्यामुळे डॉक्टरलाही आश्चर्य वाटले. " तरीसुद्धा तुम्ही यांची एकदा अँजिओग्राफी करा असे डॉ. नवीन किशोर यांनी सांगितले. ती झाल्यावर त्यानी " लेफ्ट व्हेट्रिकल फेल्युअर " असे निदान करून दिनांक १२ नोव्हेंबरला रू. १, १०, ०००/- बिल घेऊन डिसचार्ज दिला. या ट्रिटमेंटवर रमेश समाधानी नव्हता. तसेच डॉक्टरने सांगितलेले कारणही पटत नव्हते. पण काय करणार? तेथील मुक्काम हलवून ते १४ नोव्हेंबरला परत इंदूरला आले.
सकाळच्यावेळी त्या शुद्धीवर आल्या. त्यावेळेस त्यानी सांगितले, " मला श्वासच घेता येत नव्हता म्हणून मी पडले. " मग डॉक्टरने सर्व योग्य तो औषधोपचार करून त्यांची प्रकृती नॉर्मल कंडिशनला आणली. साधारण सकाळी दहा वाजता त्यांचा व्हेंटिलेटर काढला व त्या नॉर्मल श्वास घेऊ लागल्या. त्यांया घेतलेल्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्याने डॉक्टरलाही आश्चर्य वाटले. तरीसुद्धा त्यानी सौ. वहिनींना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेऊन निरीक्षण केले. नंतर दिनांक २१ ला त्यानी रु. ३०,०००/- बिलाचे पैसे घेऊन डिसचार्ज दिला. हे सर्व हायब्लड प्रेशरने झाल्याचे निदान त्यानी केले. काळजी घेण्यास सांगून त्यानी कांही औषधे लिहून दिली. मग सौ. किशोरीवहिनींना घरी आणल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र हे ब्लडप्रेशर कशाने वाढले याचे कारण हे कळलेच नाही. पण अतिश्रम, काळजी, मधुमेह वगैरे कारणे असतील अशी समजूत करून सर्वजण शक्यतो सौ. किशोरीवहिनींना त्रास होणार नाही असे वागायचे ठरवून कामाला लागली.
आता सौ. वहिनींना बरे वाटत असल्याने त्या नेहमीचे काम करू लागल्या. यंदाचे दिवाळीस सर्व नातेवाईकांनी दिल्ली येथील भाचा अरूण एकबोटे कडे जमावयाचे असे ठरवले होते. माझे व माझ्या पत्नीचे दिल्लीचे तिकीट तीन महिने अगोदर पुण्याहून मी बुक केले होते. अरूणचे आईवडील व फॅमिली तयारीसाठी दहा दिवस अगोदरच पुण्याहून दिल्लीला जाणार होती. जानोरकर फॅमिलीनेही इंदूरहून दिल्लीची तिकीटे बुक केली होती.
अरूण एकबोटेचे घर गुरगाव येथील एस्सेल टॉवर या काँप्लेक्स मध्ये होते. सर्वजण दिवाळीच्या आधी एक दिवस एकत्र जमले. सर्वांनी आठ दिवस एकत्र घालवावयाचे असे ठरवल्याने खूप मजा आली. रमेश व सौ. वहिनींना दिल्ली पाहवयाची असल्याने त्यानी एक गाडी ठरवून दिवाळीनंतर दिल्ली शहरातील मुख्य ठिकाणे पाहून घेतलीऔ. वहिनींना अक्षरधाम मंदिरात थोडे जास्त चालावयास लागले पण त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला ताजमहाल पाहवयास जायचे असल्याने त्यानी घरापासून एक गाडीच ठरवली होती. त्याना सकाळी ५ वाजता निघावयाचे होते. पण पहाटे तीन वाजताच सौ. वहिनींना त्रास होऊ लागला. त्याना श्वास घेता येईना. मागचा अनुभव असल्याने अरूणने लगेच गाडी काढली व त्याना जवळच असलेल्या "मॅक्स" हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याना आय. सी. यु. मध्ये दाखल करून लगेच ऑक्सिजन दिला गेला. तसेच व्हेंटिलेटर लावले गेले. मग बाकीच्या तपासण्या सुरू झाल्या. पुन्हा सर्व रक्ताच्या तपासण्या,रक्तदाब,ई.सी.जी. वगैरे तपासण्या चारपाच दिवसात केल्या गेल्या. सर्व टेस्ट नॉर्मल आल्या. त्यामुळे डॉक्टरलाही आश्चर्य वाटले. " तरीसुद्धा तुम्ही यांची एकदा अँजिओग्राफी करा असे डॉ. नवीन किशोर यांनी सांगितले. ती झाल्यावर त्यानी " लेफ्ट व्हेट्रिकल फेल्युअर " असे निदान करून दिनांक १२ नोव्हेंबरला रू. १,१०,०००/- बिल घेऊन डिसचार्ज दिला. या ट्रिटमेंटवर रमेश समाधानी नव्हता. तसेच डॉक्टरने सांगितलेले कारणही पटत नव्हते. पण काय करणार? तेथील मुक्काम हलवून ते १४ नोव्हेंबरला परत इंदूरला आले.
त्यांचे सर्व वास्तव्य नाशिक येथे गेले होते. त्यामुळे नाशिकला त्यांच्या ओळखीचे अनेक डॉक्टर होते. त्यापैकी एक फिजिशियन डॉ. भरत तिवारी यांच्याशी फोनवरून बोलून त्यानी सर्व हकिकत सांगितली. त्यावर त्यानी पेशंटला नाशिक येथे आणल्यास काळजीपूर्वक तपासणी करून उपाय शोधता येईल असे सांगितले. मग सर्वांचे मते सौ. किशोरीवहिनींना नाशिकला नेण्याचे ठरले. नाशिकला त्यांच्या दोन मुली असल्याने राहण्याचा व काळजीचा प्रश्न नव्हता.
मग दिनांक १५ नोव्हेंबरला सौ. वहिनींना प्रवासात त्रास होऊ नये म्हणून स्पेशल गाडीने इंदूरहून नाशिकला नेण्यात आले. तेथे दॉ. भरत त्रिवेदीनी सौ. वहिनींची आत्तापर्यंतची दोन्ही हॉस्पिटल मधील सर्व ट्रिटमेंट व टेस्ट रिपोर्ट काळजीपूर्वक तपासले. मग सौ. वहिनींना आपल्या दवाखान्यात ऍडमिट करून स्वतःच्या देखरेखीखाली ठेवले. त्यांची हॉस्पिटलने दिलेली औषधे बदलली. त्यांच्या मते ती औषधे जास्त पॉवरची असल्याने हा प्रसंग परत होण्याचा संभव होता. मग सौ. वहिनींच्या सर्व क्लिनिकल टेस्ट, ईईी. वगैरे घेतला. सर्व टेस्ट नॉर्मल होत्या. मग सोनोग्राफी व पाठीच्या मणक्यापासून ब्रेनपर्यंतच्या भागाचा एम. आर. आय. काढला. यात कोठे श्वासनलिका दाबली गेली आहे का हे पाहण्यासाठी हा एम. आर. आय. होता. तोही नॉर्मल आला होता. आता डॉक्टरने पेशंटची स्लिप स्टडी करावयाचे ठरवले. यामध्ये पेशंट झोपल्यावर कितीवेळा श्वास घेतो, किती वेळा घेत नाही, घेतल्यास त्याचे परसेण्टेज काय? किती वेळा घोरतो? वगैरे माहिती एका मशिनवर ग्राफच्या रुपाने नोंदली जाते. पेशंटच्या नाकासमोर सेंसर लावला जातो. याला " ऍप्निया " असे म्हणतात. रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंतच्या वेळेत हा स्टडी घेतला होता. या माहितीवरून सौ. वहिनींना " स्लिप ऍप्निया सिंड्रोम " असल्याचे निदान डॉक्टरने काढले. कारण पहाटे १ ते ५ च्या गाढ झोपेमध्ये त्यानी ७० वेळा श्वासच घेतला नव्हता. मग त्याचे टायट्रेशन केले गेले. यामध्ये त्याना ऑक्सिजन किती प्रेशरने द्यावा लागेल याचा स्टडी करून रिपोर्ट मिळतो. त्यप्रमाणे त्याना ७ ते ७.५ सी. एम. एच. २ओ ची आवश्यकता होती. मग ऍटो सीपॅप मशीन लावून त्यांची परत टेस्ट घेतली. त्याना आता एकदम फ्रेश वाटत होते. त्या मशिनची किंमत रु. ७०,०००/- असून ते अमेरिकन कंपनी डेव्हिल बिफ या कंपनीचे होते. मग डॉक्टरने त्याना १५.०००/- रु. चे बिल आकारून डिसचार्ज दिला. अशारितीने जवळ जवळ १,०००,००/- रु. चा खर्च झाला पण रोग निदान झाले. असा आजार व्कचितच लक्षात येत असल्याने दोन्ही हॉस्पिटल मधील डॉक्टरनी त्या बहुतेक हृदयविकारानेच आजारी असतील किंवा त्यांच्या नसा कोलॅस्ट्रोलने बंद झाल्या असतील असे समजून सर्व उपचार केले गेले होते. पण ते किती चुकीचे होते ते या रोग निदानाने कळले. आता सौ. वहिनी नेहमीची कामे करू शकतात. मात्र झोपताना ते मशीन लावून झोपावयाचे असते. आता रमेशला रोग निदान योग्यप्रकारे झाल्यामुळे समाधान मिळाले होते.
जर डॉक्टरने रोग निदान योग्य प्रकारे केले नाही तर पेशंटल किती त्रास व खर्च पडतो याचा अनुभव घेतल्याने सर्वांच्या माहितीसाठी मुद्दाम हा प्रसंग लिहिण्याचा खटाटोप केला आहे.