सज्जनगड

सज्जनगडावर  समाधी  रामदासस्वामींची
भक्त  येती, कृपादृष्टी  मिळवण्यास  त्यांची

असे गडावर पहा सुंदरसे,मंदिर  श्रीरामाचे
कोदंडधारी  राम  असे,दैवत हे श्रीस्वामींचे

जागविला  हिंदुधर्म, घेती पताका खांद्यावर
जागविला स्वाभिमान,झाला संचार देशभर

धर्मसेवक,बलोपासक,आहेत रामदासस्वामी
स्थापिती अकरा मारुती मंदिरे, नाना ग्रामी

अनुभवती स्वामी, रम्य शिवथरघळी एकांत
रचला पवित्र दासबोध,देऊनी अनेक दृष्टांत

तत्त्वज्ञान, पूर्ण  जीवनाचे, असे  सर्वार्थानी
न  करता  संसार, अनुभवले  ते  स्वामींनी

असतात  स्वामी, श्रीरामाचे  परमप्रिय भक्त
स्थापिले  राममंदिर, चाफळ गावी ते  मुक्त

पावन झाला सज्जनगड, स्वामी निवासाने
येती भाविक श्रद्धेने,  होती पावन दर्शनाने

राष्ट्रसंत स्वामी समर्थ रामदास समाधीवर
नतमस्तक होई मन,जोडोनिया दोन्ही कर