नवीन पाखरू आलं उडत
कुण्या गावच नाही कळत
अंगाने असते हे गुबगुबीत
आलय आपुल्या हे गावात
चाल आहे किती झोकात
बघते आहे बघा तोऱ्यात
छाती पाहा कशी उडवत
चालतय आपुल्या मस्तीत
डोळ्यांनी दोन्ही रे पाहत
सावज कसे आपुले हेरत
डोळ्यानी त्यास खुणवत
चालतय किती ते ऐटीत
अंग पुष्ट आपुले घुसळत
मध्येच रस्त्यात हो थांबत
लोकांना घायाळ करत
जातय ते भरकन उडत