कितीदातरी नाइलाजाने

कितीदातरी नाईलाजाने द्यावा लागतो;

हात आयुष्याच्या हातात;

डबडबलेल्या डोळ्यांनी;

मग कुठेतरी होतो घणाणता आघात;

सगळंच हरवून जातं;

पण हे सगळं अगदी निमुटपणे; ओठ बंद करून सहन करावंच लागतं.

किती साधी असतात कारणं;

आयुष्य भंगत जाण्याची;

रोजचंच आहे हे म्हणून;

रडताही येत नाही मनसोक्त;

पण आतल्या आत आपण कुठेतरी;

व्याकुळ झालेलेच असतो.

आयुष्यात हवी असणारी माणसं;

कापरासारखी उडून जातात;

पण त्यांचे संदर्भ सांगणाऱ्या;

रिकाम्या जागा भरतच नाहीत कधी;

रोजचे नवे चेहरे भेटले तरी;

पावलं स्थिर नसतातच.

                         आणी आपलं आतल्या आत मरत जाणं;

                         थांबत नाही कधीही.