चेहरा

हृदयात कोरला आहे,हसरा तुझा ग चेहरा
आठवण मनी येता,  वळवतो माझ्या नजरा

असतो निळ्या अंबरी, पुनवेचा सुंदर चंद्रमा
तसाच काळ्या कुंतली,लपला माझा चंद्रमा

चेहऱ्यावरी पाहतो,खट्याळ कुंतल बट जरी
मोहक दिससी मज, रोज पाहतो तुला परी

पाहतो तव भाळावरी,लाल कुंकवाची बिंदी
नितळ चेहऱ्यावरी तव,  खुलून दिसते धुंदी

दिसतात जवळी मला, दोन भृकुटी कमान
सोडतसी त्यामधून, तुझे तिरके नयनबाण

पाहतो ग तुजला, मृगनयनी दिसतात चक्षु
घायाळ करे मजला,फेकुनी त्यातुनी कटाक्षु

वेधून घेई लक्ष हे, चाफेकळी तुझी नासिका
खुलून दिसते चमकी,वाढवी सौंदर्य बरं का 

दिसतात मजला लाल, दोन सफरचंदी गाल
आधार घेऊनी तयांचा, सुस्त होत असे भाल

चमकती तव कानामध्ये, हिऱ्याचे सुंदर काप
लावण्यवती मजला भासे,पडते तुझीच छाप

हसताना मोहक तुझे, विलग होती ओष्टद्वय
दिसतात शुभ्र दंतपंक्ती, मौक्तिक माला द्वय

गुंगुनी जातो मी ग, हसऱ्या तुझ्या चेहऱ्यात
विरंगुळा असे मला, जेंव्हा मिळे वेळ निवांत