कोजागरी

आठवण देतो चंद्र, कोजागरीची रात
वसुंधरा नहाते पहा,शीतल चांदण्यात

निळसर नभाचा, असे भव्य कसा मंडप
लुकलुकणारे तारे, सजवती त्यात दीप

टिपुर चांदणे, शीतल करते हा आसमंत
फिरताना चांदण्यात होते मन उल्हासित

बघता नभाकडे वाटे, चंद्र हा खुणावतो
म्हणे धारतीवर आज, कोण बघू जागतो?

जागे राहण्यासाठी, खेळ खेळती अनेक
पत्ते,गाणे,विनोदात,जाती तास कित्येक 

साजरा करा ही पूनम, म्हणून एक सण
प्राशन करा दूध, नेहमी येईल  आठवण

ज्येष्ठ अपत्यास करा,आज तुम्ही औक्षण
त्याच्या सुखाचे,  करा चंद्राकडे मागणं

कोजागरीचा चंद्र देई, तुम्हांस वरदान
आनंदित रहाल, जेंव्हा घ्याल हो दर्शन