आले आले नेते आले
आले आले भाई आले
चहुबाजूनी विजयी झाले
वर्षे पाच ती सुरू जाहली
मतदार राजा झोपला घरी
नेते विसरले, भाई विसरले
यादव फसले, पवार बसले, चॉबे पडले
कुणी म्हणती वाघ आले
कुणी म्हणती "राज" आले
रामराज ते स्वप्नी दिसे
हात वर गेले नभी लागले
बार बहरले, सूर्य झोपला, सुख संपेना, दिशा उजळिना
'राज' किरण सोनेरी हे
सत्ता ती हसते आहे
दात विचकुनी विकटपणे
भांडे फोडी लोभाचे
नेते रंगले, भाई दंगले, लाटत सुटले जिकडे तिकडे चोहिकडे