तिच्यामाझ्यात

तलम वस्त्रांकित ती
अतीव लज्जेने चूर
हस्तांदोलन बदले
मिठीत कधी न कळे

गूढ शरिरी उन्मुक्त
एकात्म भावी शून्यत्व
ओठ थरथरे पुन्हा
दाताखाली दाबूनी ती

सर्व अडथळे दूर
तिच्यातले माझ्यातले
सर्वस्व देऊनी तिला
हास्य ओठांवर मूक...

ग्रामिण मुंबईकर
५ ऑक्टोबर ०९