मजुरीण

चार मैत्रीणी,अचानक घरी जमती पाहा एकत्र
गप्पा खूप चालती,  आठवणी त्यांच्या चतुरस्त्र

रंग भरतो गप्पांना आगळा, विषयांना येई ऊत
गप्पा मारता मजुरीण, विषयावर होई  एकमत

एक म्हणे, माझी मजुरीण बाई असे ग हुशार
न कळवता करते खाडे, ही असे  कामचुकार

दूसरी म्हणते, माझी बाई असते फार वाचाळ
टकळी चालते फार,कामाला करते टाळाटाळ

तीसरी म्हणे, काय सांगु,असे माझी बाई द्वाड
मागतसे सदा पैसे सांगून सबबी,ही तिची खोड

चौथी म्हणे,माझी मजुरीण असते फार ग खाष्ट
उपाशी पोटी न करे काम, पडतात तिला कष्ट

अचानक, मजुरणीचा येत असे हा दुःखद निरोप
कळवती, असे मजुरणींचा आजपासून हो  संप 

ऐकून निरोप बाईचा, दुःखदायक अशा संपाचा
बसकण मारती महिला, करती  धावा  देवाचा

भीतीने संपाच्या, मैत्रीणींच्या तोंडचे पाणी पळे
कामावर येण्यास मजुरणीस, विनवती बळेबळे

मोडली असते संवय ही अशा ह्या अंगकामाची
दिली असती सर्व कामे, ही करण्यास मोलाची

वाढवून मागत असे,  तीचा पगार ही मजुरीण
मालकिणीच्या अंगी नसे, राहिले कामाचे त्राण

मागणी तिची मान्य करून वाढवती पगार थोडा
मजुरणीस सांगती,कामावर येऊन हा संप मोडा

मग मजुरीण, दाखवून तोरा, येत असे कामाला
निश्वास सोडती गृहणी, टळली म्हणून ही बला