यात्रस्थ

यात्रस्थ मी , जीवन याञेचा
पुढच्याच्या पाउलावर
पाऊल ठेवून चालणारा
ठिकाणा माहीत नसलेला याञस्थ
       अनंत भोग भोगून जीवनाचे
       नव्या भोगासाठी आसुसलेला
       खड्डा पाहूनही पडणारा
       याञस्थ मी, जीवन याञेचा
लोभ नसलेला प्राणी विरळा
लोभाचीच तर याञा ही
मोक्षाची अभिलाषा घेऊन
याञस्थ मी, चालणारा
       वाट कुठे पोहचविणार
       माहीत नसूनही चालणारा
       कारण चालणे हा माझा धर्म
       याञस्थच मी जीवन यात्रेचा
छाले पायाचे बोलतील
माझ्या यात्रेच्या खुणा
भोगलेले भोग परिचय जुना
याञस्थच मी जीवन यात्रेचा आहेच जुना