" सत्तेची रणधुमाळी"
पोळी पोळी पोळी। जिच्यासाठी चालू आहे सत्तेची रणधुमाळी।
पोळी पोळी पोळी।ज्यांच्या हाती असते सत्ता, त्यांचीच सारे वाजवतात टाळी। ॥ध्रु॥ पोळी .....
घरात ठेवून करोडो, बाहेर भिकाऱ्यासम वागती ।
अशीच आता समाजात ,नेत्यांची आहे भरती॥
अन्नासाठी कोटी जनता, फिरते हातात घेऊन थाळी ॥ध्रु॥१॥ पोळी.....
स्वतंत्र भारत म्हणवती, राजघराण्याचा कित्ता गिरवती।
निवडणूकीसाठी सारे आपलेच , नातीगोती जमवती॥
यांचे खोट्या आश्वासनांवर, जनता नेहमी भाळी॥ध्रु॥२॥पोळी.....
अशाने कधीच होणार नाही, देशाची प्रगती।
यासाठी हवीत आपणा, निःस्वार्थ त्यागी नेती॥
तेव्हाच खऱ्या अर्थाने, साजरी होईल दिवाळी॥ध्रु॥३॥पोळी...
अनंत खोंडे.
७ ऑक्टोबर २००९.