जुगार

एका तारुण्यातल्या धुंद वेळी;

अचानक तू माझ्या आयुष्यात आलास;

माझ्या आयुष्यात मोगऱ्याप्रमाणे दरवळणारा;

माझ्या डोळ्यात स्वतःला पाहणारा;

चुकले मी की वेडी म्हणून टपली मारणारा;

अन् दाटून आले अश्रू की मिठीत घेऊन समजावणारा.

माझ्याकडे पाहून तू छान हसायचास;

तापलेल्या जमिनीवर जसा पाऊसच पडायचा;

पण जेव्हा मी भानावर आले तेव्हा तू  तेथे नव्हतास;

होत्या फक्त आठवणी अन् पाऊलखुणा.

मी त्या खुणांवरच;

माझ्या आयुष्याचा जुगार लावत गेले;

कणाकणाला विझताना सुद्धा;

अश्रू लपवून मी जगत गेले.

आता आयुष्याच्या कलत्या कातरवेळी;

लावलेल्या जुगाराचा फायदा बघताना;

मी दिपूनच गेले बघ;

कारण माझ्याकडे आहे तुझ्या आठवणींचा खजिना;

अन् तुझा माझ्यावरचा भूतकाळातला प्रेमाचा प्रवाह.