व्याकुळ झाले आज मन माझे

व्याकुळ झाले आज मन माझे;

कोमेजूनच गेले बिचारे;

रात्र सजली चांदण्यांनी;

तुझ्यावर प्रेम मी समजून उमजून केले.

रात्र सरताना पहाट थांबवण्याचा;

वेडा प्रमाद मी केला;

हृदयात जागी आठवण त्या दिसांची;

किती सावरू मनाला.

कळले किंवा नाही कळले;

का होता तुझाच भास;

तुझी चाहूल होता आसपास;

मी कित्येकदा उगाचच लाजले होते.

आकाशाकडे नजर लावून मी;

उगीचच नेहमी बसते;

तुटणाऱ्या ताऱ्याकडे मागेन मी तुला म्हणून;

रात्र रात्र वेड्यासारखी जागते.

प्रेमात रंगुनी मी आता तुझ्याच गेले;

येईल माझ्या डोळ्यांना झोप आता कशिरे;

हुरहुर आता मनाला नेहमीच असते;

तुझी सावलीसुद्धा मला जगणे नव्याने शिकवून जाते.