काय सांगायचे तुला याचा;
अर्थ माझा मलाच न कळला;
म्हणूनच तर पुढे येणाऱ्या;
वादळाला बांध पडला.
साखरेच्या अवीट गोडीने;
मी जुने क्षण वेचीत गेले;
शब्दाशब्दातून हळूच;
मी तुला खुणावीत गेले;
पण माझ्या अवकाशातून तुझा ताराच पडून गेला.
वाळूत पावलांवर माझ्या;
पावले तुझीच होती;
केसात मोगरा माझ्या;
अन् त्याला गंध तुझाच होता;
पण माझ्या हातातला तुझा हात त्यावेळीच हरवून गेला.
पुन्हा पुन्हा नव्याने;
मी आशा धरुनी मनी;
घुटमळायचे नेहमी मी;
वेडी तुझ्याच रस्त्यांवरती;
पण होताना आपण दोघे वेगळे मला कळले आपला किनारे वेगळेच होते.