सोडून चाललो मी हा आयुष्याचा प्रांत;
कळला नाही मला कधीही कुणाच्याच मनाचा थांग.
आयुष्य वेचताना;
होता मनी आधार;
हे जग माझेच आहे;
हा माझाच सारा संसार;
वंचनाच झाली इथले गाव सोडताना.
कणखर केलं मी मनाला;
सोसून प्राक्तनाचे खेळ;
बसवला घायाळ होऊन मी;
जगण्या सोसण्याचा मेळ;
पण सांगायचे कुणाला आता सहन न होई हे सारे.
कोठून सुरवात करू;
कोठे थांबायचे मी आता;
कोण होतेच का माझे;
का नव्हतोच मी कुणाचा;
प्रश्न विचारून मनाला उन्हात पाय पोळती माझे.
मी मानली ही नाती;
आयुष्य सावरताना अन् उसवतानाही;
येतात कोण कुठले;
मला जगणे शिकवण्यासाठी;
हे सोडताना इथेच सारे काट्यांचा शिरपेंच घातला मी