अशाच एका संध्याकाळी...
बसलो होतो सागर किनारी,
विचार करीत..
एकसारखा !
त्या उसळणार्या लाटांप्रमाणे...
उसळी मारून येत होता..
एक एक विचार !
किनारा गाठता गाठता..
आपले रौद्र स्वरूप..
थोडे हलके करून !
भिडताक्षणीच..
मातीला आपलंसं करणारा,
आणि
थोडा आठवणीचा ओलावा मातीत ठेवून
अलगद..
पुन्हा..
त्याच त्या सागरात मिसळून जाणारा !