वाटे नका जाऊ माझ्या अंगात आहे रग

अजून कुठवर चालायचं

असं कुरकुरत कंटाळून

कधीतरी उठावच लागेल

बंडाचं निशाण फडकवून

रेशमी बंधांच्या जेव्हा

होतात बेड्या

कुणीतरी दुसराच घेतो

तुमच्या हाती नाड्या

तेव्हा उठलच पाहिजे

तलवार परजून

सांगितलं पाहिजे

सगळ्यांना गर्जून

मी आहे माझा

माझं वेगळं जग

वाटे नका जाऊ माझ्या अंगात आहे रग