दिवसामागून दिवस जाती, वर्षामागून वर्षे
स्वागत करूया दिवाळीचे, मनापासून हर्षे
प्रगती होई मनोगताची, दर दिवसागणिक
कष्ट, मेहनत करती,अहोरात्र हो, संचालक
इच्छापूर्ती व्हावी हीच सदीच्छा दिवाकरांची
दीपावलीच्या संगे, पडती पाऊले प्रगतीची
दीपावलीचा सण, हा करा साजरा आनंदाने
सुख, समृद्धी, लाभेल दीपावलीत प्रकर्षाने
दीपावलीच्या शुभेच्छा मनोगत परिवारास
समाधान, शांती, प्रगती, लाभो दिवाळीस
दिवाळीच्या शुभेच्छा, मनोगत संचालकास
हर्षित होती दिवाकर, पाहून सुखी तुम्हास