" कोलाहल "

आयुष्य भरलेले हे सुखोत्सवे तरीही

मनी मात्र वस्ती या तमाचीच असे

घरी लोक सारेच माझे तरीही

असे वाटे मना एकटा मी असे

ना कुठे विसावा मनास

ना शांततेची कुठे चाहुल

भोवताली चालला असे हा

फक्त अन फक्त कोलाहल

सामावुनी घेता कोलाहलात त्या

नकळत आठवुनी जाते कुणी

खळखळून हसताना ही कधी

अवचित डोळा दाटून येते पाणी

ना लपायाला जागा सापडे

ना कुठला आडोसा ना ठाव

पाठलाग सदैव करत राहती

त्या निरागस डोळ्यांमधले भाव