मनातले..

उत्तर नसणार आहे म्हणून प्रश्न पडायचे थांबत नाहीत

पण प्रश्न पडणारच असतील तर उत्तरे आपला हट्ट का सोडत नाहीत?

जे हवे ते घडत नाहीच, अकल्पिताला सामोरे जातो आपण

कधी नारजीने, कधी मन मारून जगतोच कि आपण

कधी हसता हसता डोळ्यात पाणी येते, कधी तेच लपवण्यासाठी हसतो

लपंडाव सतत आपण आपल्याशीच खेळत राहतो

का? कुठवर ?