खेटरः पूजेचे आणि अडलेले

"ये घरी, तुझी खेटरानं पूजा बांधते."

या उद्गारातील खेटर म्हणजे चप्पल.

"अडलंय माझं खेटर"!

या उद्गारांचा साधारण अर्थ आहे की, मी ते काम अजिबात करणार नाही. मला काहीही गरज नाही.

'चप्पल' असा अर्थ घेतला तर उद्गारांचा अर्थ असा होतो की, छे मी ते अजिबात करणार नाही. माझी चप्पल, माझं पायताण-पादत्राण त्यासाठी अडलेले नाही. 
विचित्र वाटते.
या दुसऱ्या उद्गारांतील 'खेटर' म्हणजे नक्की काय..?
अन्वयार्थ कसा लागू शकेल?
दोन्ही उद्गारांतील खेटर शब्दाचा अर्थ निराळा आहे का ?